.................
रेती घाटांचे लिलाव करण्याची मागणी
अनसिंग : रेतीघाटांचे लिलाव पाच वर्षांपासून झालेले नाहीत. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे.
................
रस्ता दुरुस्तीकडे लक्ष पुरवा!
वाशिम : वाशिम-अकोला महामार्गावरून आययूडीपी काॅलनीत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. रस्ता दुुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
................
देयके अदा करण्याचे आवाहन
मंगरूळपीर : विद्युत ग्राहकांकडे लाखो रुपये थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी केले.
.................
वाशिममध्ये प्लॅस्टिकबंदीचा फज्जा
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, याकरिता मध्यंतरी दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र त्यानंतर कारवाईत खंड पडल्यामुळे प्लॅस्टिकबंदीचा पूर्णत: फज्जा उडाला आहे.
..............
कर्ज तत्काळ मंजूर करण्याचे आवाहन
वाशिम : मुख्यमंत्री रोजगार योजनेतून निर्धारित निकषांप्रमाणे पात्र लाभार्थींना विनाविलंब कर्ज मंजूर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी केले.