०००००००
कोरोनामुळे समृद्ध गाव स्पर्धा प्रभावित
वाशिम : सुजलाम्, सुफलाम् गावे करण्यासाठी समृद्ध गाव स्पर्धा अभियान राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे समृद्ध गाव स्पर्धा अभियान ही प्रभावित झाले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम ही ठप्प झाला आहे.
०००
दोन कोविड रुग्णालयांना मंजुरी
वाशिम : कोरोना बाधितांवर वेळेवर व योग्य उपचार मिळावे याकरिता खासगी कोविड रुग्णालयांना मंजुरी दिली जात आहे. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात आणखी दोन खासगी कोविड रुग्णालयाला गुरूवारी मंजुरी दिली आहे.
००
पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहण
वाशिम : जिल्ह्यातील जवळपास ५० गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होत असून, पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहणाची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित यंत्रणेला शुक्रवारी दिल्या.
००००
संपर्कातील व्यक्तींची चाचणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ७ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.