लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्यावतीने फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी फलोत्पादन विकास योजनेंतर्गत रोहयोशी निगडीत फळबाग लागवड योजना २०१५ ते जून २०१८ दरम्यान राबविण्यात आली. या योजनेंतर्गत पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्याचा अपवाद वगळता उर्वरीत दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अनुदानासाठी दोन वर्षांपासून पायपिट सुरू होती. दरम्यान दीर्घ विलंबाने मिळालेले अनुदान आचारसंहितेपूर्वीच सर्व पात्र शेतकऱ्यांना वाटप करण्यात आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला.पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीने फळबागेची जोड मिळावी म्हणून राज्यात रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. या अंतर्गत लाभार्थी शेतकºयाच्या शेताच्या बांधावर विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. या योजनेच्या निकषानुसार पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. अकोला जिल्ह्यात २०१८ या वर्षातच पात्र शेतकºयांना अनुदान देण्यात आले. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात अनुदान देण्यात आले. मात्र, वाशिम जिल्ह्यातील प्रश्न रेंगाळला होता. वाशिम जिल्ह्यात २०१५ ते २०१८ या तीन वर्षांतील खर्चासाठी ७९.९६ लाख रुपये मागणी नोंदविली होती. तीन वर्षांपासून सदर अनुदान प्रलंबित होते. ३३९.१९ हेक्टर क्षेत्रावरील खर्चासाठी ४९.७९ लाख रुपये दीर्घ प्रतिक्षेनंतर मिळाल्याने फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पडले. आचारसंहितेपूर्वीच पात्र शेतकºयांना प्रलंबित असलेले अनुदान मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा मिळाला. रोहयोशी निगडित फळबाग लागवड योजनेंतर्गत खर्चाची मागणी जिल्हाधिकाºयांकडे नोंदविली होती. सदर मागणी मान्य झाल्याने पात्र शेतकºयांना अनुदान वितरण करण्यात आले.- दत्तात्रय गावसाने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम
फळझाड उत्पादक शेतकऱ्यांना दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाले अनुदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 5:59 PM