मंगरूळपीर... प्राणघातक हल्ला व ॲट्रॉसिटी प्रकरणातील चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस डी.बी. पथकाने आंध्र प्रदेशातील धारकोंडा या नक्षलग्रस्त भागातून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान अहमद शेख रफीक शेख (रा. शेलुबाजार) याच्यावर पोलिसांनी कलम ३०७, ३४ व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हे दाखल केले होते. परंतु चार महिन्यांपासून हा आरोपी फरार झाला होता. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी या फरार आरोपीस शोधण्याची जबाबदारी डी.बी. पथकावर सोपविली. डी.बी. पथकाने गोपनीय माहिती काढली असता फरार आरोपी हा आंध्र प्रदेशातील धारकोंडा ह्या नक्षल भागात गांजाची तस्करी करीत असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी आंध्र प्रदेशात जाऊन आरोपीस अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार जगदाळे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुष्मा परांडे, पो. ना. अमोल मुंदे, पो. कॉ. महम्मद परसुवाले, सचिन शिंदे यांनी केली.