येथुन जवळच असलेल्या ग्राम मनभा येथील सरपंच वहीदबेग मिर्झा यांच्या गर्भवती मुलीला माहेरवरून दोन लाख रुपए आणण्यासाठी विवाहीता कुसलुम हीचा छळ करून खुन केल्याच्या गुन्ह्यात तब्बल सहा महिन्यापासुन सासू सासरे फरार होते. समियोद्दीन चिरगोद्दीन सिद्धीकी (५१) आणि आयेशा समियोद्दीन सिध्दीकी (४८) अशी आरोपींची नावे आहेत. .३ आॅक्टोबर २०२० रोजी सकाळी कुसलुम हीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता . आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याचा बनाव आरोपींनी केला होता . घटनेच्या पहील्या दिवशी मयत विवाहितेचे वडील वहीदबेग सत्तारबेग मिर्झा ( रा. मनभा ता.कारंजा जि वाशिम ) यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार सातारा ठाण्यात आरोपी पती, सासु, सासरा यांचे विरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान शवविच्छेदन अहवाल आणि न्याय सहायक प्रयोगशाळेच्या गोपनीय अहवाला नुसार कुसलुमचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे पोलीसांनी सर्व आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेपासुन आरोपी सहाय्यक फौजदार समियोद्दीन आजारी रजा टाकुन फरार झाला होता. पोलीसांना तो सारखा चकमा देत होता .सोमवारी दोघांनीही तपास अधिकारी निकम यांच्यासमोर शरणागती पत्करली . कुलसूम हीचा सासरा हा सहाय्यक फौजदार असल्यामुळे यात सातारा पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मृतक विवाहितेच्या नातेवाईकांनी केला होता . वरीष्ठांनी हा तपास निपक्षपातीपणे केला जाईल असे आश्वासन देवुन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपाली निकम यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविला होता.
खून प्रकरणातील फरार सासु सास-याला सहा महीन्यानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:42 AM