वाशीम - स्थानिक नालंदानगर येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त जयंती उत्सव समितीच्यावतीने ११ ते १४ एप्रिलपर्यत विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त महापुरुषांच्या प्रतिमांना मानवंदना व पुज्य भन्ते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण व धम्मवंदना होईल. त्यानंतर ‘जोतीबा फुले यांची क्रांती व आजची परिस्थिती’ या विषयावर दीपक जावळे यांचे व्याख्यान होईल. न.प. सभापती आम्रपाली ताजणे यांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता भिमशाहीर चेतन लोखंडे आणि संच यांचा समाज प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम होईल. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सामुहिक बुध्द वंदना व भन्ते प्रज्ञापालजी यांची धम्मदेशना होईल. सायंकाळी ७ वाजता अॅड. साहेबराव शिरसाट हिंगोली यांचे ‘अॅट्रासिटी अॅक्ट एस.सी. एस.टी. समुहावरील वाढते अत्याचार व यावर उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
यावेळी अॅड. पी.पी. अंभोरे, अॅड. संजय पठाडे, अॅड. सचिन पट्टेबहादुर, अॅड. एन.के. पडघान, अॅड. गौतम गायकवाड, अॅड. किरण पट्टेबहादुर, अॅड. श्रृंगारे यांची उपस्थिती राहील. रात्री ८ वाजता भिमा तुज्या जन्मामुळे या विषयावर कवीसंमेलन कवी दीपक ढोले, अनिल कांबळे, डॉ. विजय काळे, मोहन सिरसाट, महेंद्र ताजणे, उषा अढागळे, हंसिनी उचित, प्रज्ञानंद भगत, विलास भालेराव, मधुराणी बन्सोड, ग.ना. कांबळे, धम्मपाल पाईकराव, अॅड. नारायण पडघाण आदी कवींच्या सहभागातून आयोजित करण्यात आले आहे. कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान विद्रोही कवी शेषराव धांडे हे भुषवतील तर सुत्रसंचालन प्रा. सुनिता अवचार ह्या करतील. १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भन्ते प्रज्ञापाल व डॉ. कपिल सुर्वे यांच्या मार्गदर्शनात विपश्यना व ध्यान साधना शिबीर ठेवण्यात आले आहे. तर सायंकाळी ७ वाजता पंकजपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.
१४ एप्रिलला सकाळी साडे सात वाजता पुज्य भन्ते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण व धम्मवंदनेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर साडेसात वाजता भव्य धम्मरॅली धम्मरथ, झेंडे, बॅनर, बॅन्डपथकासह त्रिरत्न बुध्द विहारापासून डॉ. आंबेडकर भवन, कर्मचारी वसाहत, सिव्हील लाईन पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यत युवा नेते संतोष ठोके यांच्या नेतृत्वात काढली जाईल. रॅलीचा समारोप भारतीय सैनिक यांच्याकडून मानवंदना व सामुहिक बुध्दवंदनेनंतर होईल. सायंकाळी ६ वाजता डॉ. आंबेडकर यांची सामाजिक क्रांती व आजची परिस्थिती या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, मुलांची भाषणे, कविता, सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे, एकपात्री नाटक इत्यादी कार्यक्रम होतील. समारोपीय आभार संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल इंगोेले हे करतील.
संयुक्त जयंती उत्सवाला व त्यानिमित्त होणाºया सर्व कार्यक्रमांना समाजबांधव व नागरीक, महिला भगिनींनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रपिता महात्मा जोतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब अांबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती नालंदानगरच्या वतीने करण्यात आले