वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या मुदतीत विहिरींची कामे पूर्ण करून घेण्यासाठी रोजगार हमी योजना विभागाची धडपड सुरू आहे. मात्र, उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडचणींमुळे त्यास म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जवाहर धडक सिंचन विहिर योजनेतील विहिरी, नरेगातून धडक सिंचन विहीर योजनेत वर्ग करण्यात आलेल्या विहिरी व रद्द केलेल्या विहिरींपैकी पुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरी आता ३० जून २०१८ जून पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. या विहिरी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वेळोवेळी सुचना देखील देण्यात आल्या आहेत. संबधित लाभार्थी शेतकºयांनी मिळालेल्या मुदतवाढीचा लाभ घेऊन आपल्या अपूर्ण तसेच अद्याप सुरु न झालेल्या धडक सिंचन विहिरी ३० जून पूर्वी पूर्ण करून तसा अहवाल प्रशासनाकडे सादर करावा, असे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी केले. ६,१३० विहिरींची कामे झाली पूर्ण!जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात ६ हजार १३० विहिरींची कामे पूर्ण झाली असून उर्वरित विहिरींची कामे येत्या ३० जूनपर्यंत निश्चितपणे पूर्ण केली जातील. त्यादृष्टीने ‘रोहयो’चे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
विहिरींची कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी ‘रोहयो’ची धडपड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 3:03 PM
वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या
ठळक मुद्देपुन्हा सुरु करावयाच्या धडक सिंचन विहिरी आता ३० जून २०१८ जून पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत यापूर्वी वेळोवेळी सुचना देखील देण्यात आल्या आहेत.