लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वाशिम जिल्हा इतर बाबींसह शिक्षणातही प्रचंड मागासलेला आहे. वाशिमचा मानव निर्देशांकात तब्बल ३३ वा क्रमांक लागतो. जिल्ह्यात मागासवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथे इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) वसतीगृह मंजुर करुन बांधकामाकरिता विशेष बाब म्हणून १० कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी २२ नोव्हेबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.वाशिम जिल्हा हा अत्यंत मागासगलेला असून शैक्षणिकदृष्ट्या सुदृढ होण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हयात ओबीसी अर्थात इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी किमान एक वसतीगृह उभे होणे अत्यंत गरजेचे आहे. वसतिगृहाची सोय नसल्यामुळे नाईलाजास्तव वाशिम जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय घटकातील बरेच विद्यार्थी इतर जिल्हयात जावून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना हा खर्च झेपल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा स्थितीत वाशिम येथे मागासवर्गीय वसतीगृह मंजुर होऊन उभे झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा मोठा आधार होवून आपल्याच जिल्हयात शिक्षण पुर्ण करता येईल. त्यामुळे वसतिगृहाची मागणी मंजूर करून आवश्यक निधी द्यावा, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
वाशिम येथे ओबीसी वसतीगृहासाठी १० कोटीचा निधी द्या - आमदार राजेंद्र पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 7:10 PM
वाशिम जिल्हा इतर बाबींसह शिक्षणातही प्रचंड मागासलेला आहे. जिल्ह्यात मागासवर्गीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथे इतर मागासवर्गीयांकरिता (ओबीसी) वसतीगृह मंजुर करुन १० कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली.
ठळक मुद्देआमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणीवाशिम जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक