लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कृषी विभागाच्यावतीने फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी फलोत्पादन विकास योजनेंतर्गत रोहयोशी निगडीत फळबाग लागवड योजना २०१५ ते जून २०१८ दरम्यान राबविण्यात आली. या योजनेंतर्गत पश्चिम वºहाडात शेकडो हेक्टरवर फळझाड लागवड झाली; परंतु अकोला जिल्हा वगळता इतर दोन जिल्ह्यात या योजनेच्या खर्चासाठी केलेल्या निधीची मागणीच पूर्ण झाली नाही. त्यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे पायपीट करीत आहेत.पारंपारिक शेतीला आधुनिक पद्धतीने फळबागेची जोड मिळावी म्हणून राज्यात रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना राबविण्यात आली. या अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. या योजनेंतर्गत लागणारा निधी हा जिल्हाधिकाºयांकडून मंजूर होणार होता. योजनेच्या निकषानुसार पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली. त्यापैकी शेवटच्या वर्षात अर्थात २०१८ साठी अकोला जिल्ह्यत जिल्हाधिकाºयांकडून २७ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मागणीनुसार मंजूर करण्यात आला, तर या जिल्ह्यात प्रत्यक्ष निकषानुसार ७ लाख रुपये खर्च होऊ शकला. त्यामुळे अकोला जिल्ह्यात या योजनेचा शिल्लक निधी परत करावा लागला; परंतु वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात मात्र गेल्या तीन वर्षातील खर्चासाठी मागणी केलेल्या निधीच्या तुलनेत कमी निधी प्राप्त झाला. वाशिम जिल्ह्यात २०१५ ते २०१८ या तीन वर्षांतील खर्चासाठी एकूण मागणी ७९.९६ लाख असताना अद्याप ३३९.१९ हेक्टर क्षेत्रावरील खर्चासाठी आवश्यक ४९.७९ लाख रुपये अद्यापही मिळाले नाहीत. दोन वर्षापासून या योजनेचे लाभार्थी शेतकरी कृषी विभागाकडे अनुदानासाठी येरझारा घालत आहेत.
रोहयोशी निगडित फळबाग लागवड योजनेंतर्गत खर्चाची मागणी जिल्हाधिकाºयांकडे नोंदविण्यात आली आहे. रक्कम प्राप्त होताच शेतकºयांना अनुदानाचे वितरण करण्यात येईल.-दत्तात्रय गावसानेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीवाशिम