मालेगाव : शहरासाठी उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर व्हावी मन म्हणून १ कोटी ३४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली , मात्र गेल्या अनेक दिवसापासून मालेगावला विकासासाठी आलेला सव्वादोन कोटींचा निधी तसाच पडून आहे, ही विकास कामे कधी मार्गी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . ३१ मार्च पूर्वी विकास कामे सुरू झाली नाही तर तो निधी परत सुद्धा जाऊ शकतो.
नवनिर्मित नगरपंचायत म्हणून मालेगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्या अंतर्गत शहरातील वॉर्डावॉर्डात रस्ते बांधकाम करणे, नाली बांधकाम यासह स्मशानभूमीचे सौंदर्यीकरणासह अन्य मुलभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ही कामे केली जाणार आहेत. गेल्या ३ महिन्यापासून हा गाजावजा सुरु आसुंन ही कामे कधी मार्गी लागणार याची मालेगांव कराना उत्सुकता लागली आहे. मालेगांव नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून आज पर्यंत एकही डोळ्यात भरण्यासारखे विकास काम झाले नाही . फक्त सव्वा दोन कोटी देऊन वरिष्ठ स्तरावरून सुद्धा नावडतीची वागणूक मालेगाव नगरपंचायतीला देण्यात आली. मालेगाव नगर पंचायत विकास कामांतर्गत फक्त सव्वादोन कोटी दिले त्यातही मालेगाव ची लोकसंख्या पंचवीस हजाराच्या आसपास आहे आणि १७ प्रभागात हे सव्वादोन कोटी कसे वाटप करणार हा सुद्धा प्रश्न प्रशासनाकडे निर्माण झाला आहे . तरी सर्व सदस्यांनी मिळून थोडेफार का होईना विकास कामे करण्यासाठी सवार्नुमते ठराव घेऊन तो वरिष्ठ स्तरावर पाठवलाय . त्यामध्ये अनेक प्रभागात रस्ते ,नाल्या अनेक ठिकाणी पेवर ब्लाक बसवणे आदीसह सिमेंट रोड चे कामे करणे , हिंदू स्मशानभूमी , मुस्लिम स्मशानभूमी तसेच बौद्ध स्मशानभूमी यासोबतच सर्व धर्मीय स्वत: भूमीचे सौंदर्यीकरण करणे , मुलभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. यासह अनेक बाबी त्या ठरावात नमूद करण्यात आलेले आहेत आणि हा ठराव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सर्व कागदपत्र सोबत पाठवण्यात आला आहे ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करणार असून यामध्ये सर्व सदस्य तसेच गावकरी यांनी सहकायार्ची भूमिका बजावणे अतिशय आवश्यक आहे . कारण थोड्याफार प्रमाणात वाद झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतेही काम करणार नाही. तसेच नगरसेवकांनी सामंजस्याने आपल्या प्रभागातील कामे करून घ्यावीत कारण एकवेळेस ही कामे प्रलंबित राहिल्यास पुन्हा कधी होतील हे सांगता येणार नाही अधिकृत माहितीनुसार नगरपंचायत कडून ठराव घेण्यात आला नंतर सा बा विभागाने तो ठराव त्यांच्या वरिष्ठाकडे पाठवन्यात आला आहे ती काम कधी सुरू होतील त्याची सर्व मालेगावकरांना उत्सुकता लागली आहे ही कामे लवकरात लवकर व्हावी यासाठी सर्व नगरसेवकांनी एकत्र बसून हे काम मार्गी लावणे आवश्यक आहे
मालेगाव नगर पंचायतकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सर्व ठराव तसेच सर्व कागदपत्रे पोहचवण्यात आली आहेत . त्याचा पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. पुढील प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर लवकर सुरू करावी यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे.
- गणेश पांडे, मुख्याधिकारी मालेगांव
मालेगाव शहराच्या विकासासाठी सव्वादोन कोटींचा निधी म्हणजे अत्यल्प निधी असून शहराच्या विकासासाठी आणखी निधीची गरज आहे . आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून आणखी निधी आणण्याचा प्रयत्न करत आहो. तसेच सव्वादोन कोटीच्या कामाबाबत आम्ही सर्व सदस्य मिळून सामूहिक प्रयत्न करून ही कामे मार्गी लावणार आहोत
- मीनाक्षी सावंत, नगराध्यक्ष मालेगाव