लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : उत्तरप्रदेशमधील एका ट्रक क्लिनरला अस्वस्थ वाटत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर काही तासात मृत्यू झाल्याची घटना ३ मे रोजी घडली . मृत्यू झाल्याने त्याचा थ्रोट स्वॅब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्या क्लिनरच्या मृतदेहावर ४ मे रोजी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी असणे आवश्यक असताना एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने नगरपरिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचाºयांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.कोरोनाबाधित मृतकाचा अंत्यसंस्कार करताना गर्दी नको म्हणून कमी लोकांमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी किमान ५ व्यक्तीच्यावर नागरिक नसावेत. परंतु योग्य मार्गदर्शनासाठी आरोग्य अधिकारी असणे आवश्यक असताना वाशिम येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कारावेळी केवळ नगरपरिषदेतील चार कर्मचारी व एक आरोग्य निरिक्षकांनीच अंत्यसंस्कार केलेत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता रुग्णालयातून मृतदेह देताना सर्व सोपस्कार पूर्ण करुन देण्यात आले असल्याने स्मशानभूमीमध्ये आरोग्य अधिकारी यांची व्यवस्थेची गरज नसल्याचे म्हटले. परंतु नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचाºयांमध्ये आम्हाला कोणत्याच प्रकारची अंत्यसंस्कार करतांना घेण्याची खबरदारीची माहिती नसतांना आमच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याचे बोलल्या जात आहे. तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह हा स्वर्गरथात (शव घेऊन जाणारे वाहन) नेण्यात आला. अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या स्वर्गरथाचे क्लिनिंग होणे आवश्यक असताना ते करण्यात आले नाही. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी क्लिनिंग करण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर मृतकावर अंत्यसंस्कारासाठी नगराध्यक्ष अशोक हेडा व मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या पुढाकाराचे कौतूक होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतिने सर्जीकलकीटमध्ये मृतदेह दयायला पाहिजे होता. तसेच कर्मचाºयांना ज्या किट दिल्यात त्याही खराब होत्या. तरी सुध्दा आमच्या कीट वापरुन आमचे कार्य पूर्ण केले.- अशोक हेडानगराध्यक्ष, वाशिम
कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह नियमानुसार बांधून तसेच नगरपरिषदेच्या कर्मचाºयांना पिपिटी कीट देऊन अंत्यसंस्कारासाठी पाठविण्यात आला होता. तसेच येथूनच सर्व सूचना देण्यात आल्या होत्या.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम