या कार्यालयातील जबाबदार असणारे सहायक दुय्यम निबंधक अधिकारी हे सुध्दा मास्क लावून कामकाज करीत नाही. तसेच कार्यालयात येणारे नागरिक सुध्दा कोणत्याही प्रकारचे मास्क न लावता या कार्यालयात गर्दी करतात. कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत नाही. खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी यवतमाळ, अमरावती, अकोला या सह पुणे मुंबई येथे नागरिक खरेदी विक्रीकरिता व्यवहार करण्यासाठी त्या कार्यालयात येतात. त्यामुळे या कार्यालयातून कोरेाना संक्रमण होण्याची शक्यता दाट आहे. तसेच या कार्यालयातील एक अधिकारी कोरोनाबाधित सुध्दा निघाला असताना या कार्यालयात कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे नियम पालन होत नाही. कोणत्याही प्रकारचा वचक नसल्यामुळे मास नाही, सॅनिटायझरचा उपयोग हेात नाही. या सर्व बाबीकडे शहरातील प्लाॅट व्यावसायिक गर्दी करून नियमाचे पालन करीत नाही. त्यामुळे व्यवहार हा नियमाप्रमाणे व्हावा अशी मागणी होत आहे.
कारंजा दुययम निबंधक कार्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमावलीचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:41 AM