लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक गटांचे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र दिसून आले. तालुक्यात अनेक प्रस्थापितांची पत मात्र उघड झाली. तालुक्यात सर्वाधिक ग्रा.पं.च्या निवडणुका या टप्प्यात असल्याने आणि भविष्यातील निवडणुका लक्षात घेता याला महत्त्व प्राप्त झाले. जसजसे निकाल लागले तसे गुलालाचा उधळण होत गेली. संपूर्ण शहरातील रस्ते गुलालमय झाली. तालुक्यात पहिला निकाल ग्रा.पं. पोहरादेवीचा आला. यात माजी आ. अनंतकुमार पाटील गटाचा सरपंच पदाचा उमेदवाराचा पराभव होऊन प्रथमच विरोधी गटाचा सरपंच जनतेतून निवडून आला. निवडून आलेला सरपंच पोहरादेवी तीर्थ विकास पॅनलचे असल्याचे जितेंद्र महाराज, कबीरदास महाराज, रमेश महाराज मोन्टी राठोड, नवनिर्वाचित सरपंच लक्ष्मीबाई खंडारे, यांनी सांगितले. येथे ‘गड आला, पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. माहुली ग्रा.पं.मध्ये कृउबासचे संचालक राम राठोड सरपंचपदी प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली. सोयजना ग्रा.पं.मध्ये गणेश मिसाळ गटाचा सफाया झाला असून, विनोद चव्हाण यांचा ३ मतांनी निसटता विजय झाला, धानोरा ग्रा.पं.मध्ये माजी सभापती नीळकंठ घाटगे गटाचा सफाया झाला. येथे केशवराव नाईक आणि शेषराव नाईक या दोन भावाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात शेषराव नाईक यांच्या सुनेचा पराभव झाला, तर केशवराव नाईक गटाचा विजय झाला. रोहणा ग्रामपंचायतमध्ये नरेंद्र राऊत गटाचा पराभव झाला असून, येथे पवार गटाचा झेंडा फडकला. यात काशीराम राठोड यांनाही आपली पत राखता आली नाही. जनुना खुर्द ग्रा.पं.मध्ये बँकेचे संचालक उमेश ठाकरे गटाने झेंडा फडकविला. आसोला ग्रा.पं. मध्ये जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रकाश राठोड गटाचा सुपडा साफ झाला. आमदरी ग्रा.पं.मध्ये दोन दिग्गज भावात भाजपाचे ठाकूरसिंग चव्हाण यांच्या गटाची सरशी झाली. येथे बाजार समितीचे उपसभापती गोविंद चव्हाण, चिंतामन चव्हाण यांची सून पराभूत झाली. एकलारा ग्रा.पं.मध्ये भाजपाचे उपतालुका प्रमुख दिलीप चव्हाण यांच्या गटाला सत्ता कायम राखता आली नाही, हे विशेष. -
मानोर्यात ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:03 AM
मानोरा: तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत अनेक गटांचे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाल्याने ‘गड आला, पण सिंह गेला’चे चित्र दिसून आले.
ठळक मुद्देप्रस्थापित गटांना हादरेराजकीय नेत्यांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न