वाशिम : जिल्हयात ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची ना. नितिन गडकरी यांनी प्रशंसा करुन पदाधिकाºायंचे कौतूक केले.
बेटी बचाओ बेटी पढाओाचे संयोजक डॉ. दीपक ढोके व तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या वतीने मोठे अभियान जिल्हयात राबविण्यात येत असून लग्न समारंभात वर वधुंना बेटी बचावचा आठवा फेरा व पर्यावरणाचा नववा फेरा देण्यात येत आहे. हा आगळावेगळा उपक्रम माहित होताच ना. नितिन गडकरी यांनी या अभियानाची प्रशंसा केली. निश्चितच यामुळे समाजामध्ये मुलामुलींमधील भेद कमी होवून महिलांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हे अभियान वाशिम जिल्हयात स्तुत्यपणे राबवित असल्याने त्यांनी या कार्याचे कौतूक केले.
गत वीस वषार्पासून सामाजीक क्षेत्रात भरीव कार्य करणारे तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर यांनी नुकतीच ना. नितीन गडकरी यांची भेट नागपूर येथे घेतली त्यावेळी त्यांनी ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान कार्याचे कौतूक केले. तसेच नलेश सोमाणी यांच्या सामाजीक कायार्ची दखल घेवून केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी ५१ हजार रुपयाचा धनादेश देवून त्यांना युवागौरव म्हणून सन्मानित केले. तसेच ना. गडकरी यांना निलेश सोमाणी यांनी बहुचर्चित गीनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले तरुण सागरजी महाराज यांचे कडवे प्रवचन पुस्तक भेट दिले. सोबतच आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्यावरील संयम स्वर्णीम सुवर्ण महोत्सव या विशेषांकाचे विमोचनही ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, देशमुख उपस्थित होते.