लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : "गण गण गणांत बोते" ,"गजानन महाराज की जय" जयकार करीत शेगाव निवासी संत गजानन महाराज यांची पालखीचे रात्रीच्या मुक्कामानंतर ८ जून रोजी सकाळी पुढील प्रवासाठी रवाना झाली. यावेळी शिरपूरवासीयांनी भावपूर्ण निरोप दिला.गजानन महाराज संस्थान शेगावची पालखी ७ जून रोजी शिरपूर नगरीत दाखल झाली होती. आषाढी उत्सवासाठी संत गजानन महाराजांची निघालेली पालखी सोहळय़ाच्या दर्शनाचा पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी लाभ घेतला. ७ जून रोजी येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये मुक्कामी पाल खीच्या दर्शनाकरिता भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पालखीतील वारकर्यांनी प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम घेतले. शिरपुरातून पालखीचे प्रस्थान होत असताना शिरपूरवासीयांनी भावपूर्ण निरोप दिला. यावेळी पालखी मार्गात मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी बसस्थानक चौक व कोंडबातातया ढवळे विद्यालयालगत भाविकांच्यावतीने चहा, दूध, नाश्ता याची व्यवस्था करण्यात आली होती. रिसोड फाटा, स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयाजवळ, संभाजी नवयुवक मंडळाच्यावतीनेही अल्पोपाहार, साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले, तर आरोग्य केंद्रासमोर सुकामेवाची पाकिटे वारकर्यांना वाटप करण्यात आली. अरिहंत विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी वारकर्यांवर फुलांच्या पाकळया उधळून त्यांचे स्वागत केले. पालखी वसारी येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांच्यावतीने पाल खीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
गजानन महाराज पालखीचे शिरपुरातून प्रस्थान
By admin | Published: June 09, 2017 1:25 AM