मालेगाव : ह्यमाझे कुलदैवत गजानन आहे त्याच्या पायी आहे माझा जिव पावतसे भक्ता आशीर्वाद देई आमाचि ही आई प्रेमस्वरूप उच्चरिता नाम होत असे आनंद गजानन स्मरा नित्य नेम भक्ति करा ठाम केवळ त्याचीह्ण या उक्ति प्रमाणे आज सर्वत्र मालेगांव शहर गजानन मय झाले होते.विदभार्चे आराध्य दैवत असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज पालखिचे जिल्ह्यात जोरदार आगमन झाले . ७ जून रोजी सकाळी ८ वाजता मालेगांव शहरात पालखी दाखल झाली होती. पालखी आल्या बरोबर पाण्याच्या टाकी जवळ फटाके फोडून ढोल ताशा च्या गजरात स्वागत करण्यात आले. पालखीचे ६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता डव्हा येथे जोरदार आगमन झाले होते. शेगाव येथून ३१ में रोजी ही पालखी निघाली असून २ जुलै रोजी पंढरपुर येथे पोहचनार आहे. पालखी सोबत् ा६०० वारकरी , ३ अश्व ,९ वाहने रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आदी संसथानच्यावतीने सोबत आणण्यात आलेले आहे . पालखी मधे शिस्तबद्ध रित्या पांढरा गणवेश घेतलेले वारकरी हातात टाळ, मृदंग आणि भगवे झेंडे घेऊन असल्याने पालखी सोहळा लक्षवेधी ठरत आहे. सर्व ठिकाणी ह्यजय गजानन चा गजरह्ण होत होता सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते मालेगांव येथे ठीक ठिकाणी रांगोळी काढलेल्या होत्या, ठीक ठिकाणी चहा ठंड पेय , मट्ठा, वाटप करण्यात आले . पालखिचे आगमन काल मेडशि येथे सकाळी 9 वाजता झाले त्यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले , त्यानंतर पालखी सुकांडा येथे आली त्यावेळी सुकांडा येथील गजानन महाराज मंदिराच्यावतीने पालखिचे स्वागत करण्यात आले . त्यांनतर पालखी कुरळा येथे आली त्यावेळी सुद्धा चहा पानी ची व्यवस्था करण्यात आली होती डव्हा येथे संस्थानच्या वतीने पालखीचे स्वागत करुन कुरळा ग्रामस्थांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी अनेक भविकानि दशनरचा लाभ घेतला आणि सकाळी ८ वाजता पालखीचे मालेगांव येथे आगमन झाले. पालखिला पंचायत समिति च्या प्रांगणात पंचायत समिति कर्मचारी अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वतीने पूरी आणि आलू चटनी चा नास्ता देण्यात आला त्यावेळी तहसील दार राजेश वजीरे, गट विकास अधिकारी, बाल विकास अधिकारी सोलव, सभापति उ,पसभापति , ज्ञानबा सावले, बबनराव चोपडे , गजानन सारस्कार , किरण जिरवनकर , मेजर घुगे आदि मंडळी उपस्तिथ होती. त्यांनातर पालखी मुख्या मागार्ने शिव चौक, गांधी चौक, जैन मंदिर समोरून मेडिकल चौकसतुन्न जुन्या बस स्टैंड मार्गे माहेश्वरी भवन येथे गेली. त्या ठिकाणी गोपाल मुंडदा आणि सत्तू मूंदड़ा (पळशीवाले ) यांच्या तर्फ भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती तेथे भोजन झाल्यानंतर पालखी शिरपूरकडे रवाना झाली मधे शीरपुर रस्त्यावर सुद्धा अनेक भाविक भक्तांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले
गजाननाच्या दर्शनाला जनसागर उसळला!
By admin | Published: June 07, 2017 2:09 PM