वाशिम : रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणी शेतशिवारामध्ये जुगार खेळणार्या १७ इसमांना पोलिसांनी रंगेहात पकडले. तर, दोन इसम पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले. ही घटना २७ जुन रोजी घडली. रिसोड पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोणी येथील शेतशिवारामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर, उत्तम गायकवाड, विष्णुपंत वाघमारे, विनोद अवगळे, विपुल शेळके, संदिप ईढोळे, नागोराव खंडके, आत्माराम राठोड यांचा समावेश असलेल्या पथकाने वरली मटका सुरू असलेल्या घटनास्थळावर छापा टाकला. या छाप्यामध्ये असमत खान छोटे खान, नामदेव पराडे, अफताब कुरेशी, फारूख शेख रऊफ शेख, राजु तुरेराव, विठ्ठल बोडखे, गौतम कुरेशी, नामदेव सोनुने, रामजी कोकाटे, अंकुश पवार, विठ्ठल चौगुले, परमेश्वर बोडखे, रतन श्रीराम गवंडी, नारायण टाले, सिताराम नालेगावकर, धोंडू खरडे, संतोष मोरे यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. यावेळी तेथे जुगार चालविणारे संतोष यशवंत चौगुले, नामदेव हरी राठोड या दोघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी उपरोक्त १९ आरोपींविरुद्ध मुंबई जुगार अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यातील १७ इसमांना अटक केली.
जुगारअड्डयावर छापा, १९ आरोपींवर गुन्हा
By admin | Published: June 30, 2014 1:51 AM