मालेगाव - पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना नोटांचा हार घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी मालेगावात गांधीगिरी आंदोलन केले. पीककर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडू नका, अन्यथा बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप प्रक्रिया तापदायक ठरत आहे. जिल्हयात १५०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने खरिप हंगामही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पीककर्ज देत असताना विविध स्वरूपातील अटी व शर्थी लादून शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. पीककर्ज वाटप प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने बँक प्रशासनाला दिलेले आहेत. तथापि, जिल्हा प्रशासनाने निर्देश पायदळी तुडवित अद्यापही अनेक बँकांनी पाच टक्केही पीककर्ज वाटप केले नाही. मालेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने पीककर्ज वाटपात प्रचंड दिरंगाई केल्याची माहिती मिळताच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले व पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, १९ जून रोजी संबंधित बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक कुलकर्णी यांना नोटांचा हार घालून गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले. पीककर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा शेतकरी हितार्थ स्वाभिमानी संघटना उद्रेक करेल, असा इशारा इंगोले यांनी दिला.
पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना घातला नोटांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 3:54 PM
मालेगाव - पीककर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना नोटांचा हार घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी मालेगावात गांधीगिरी आंदोलन केले.
ठळक मुद्देबहुतांश शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नसल्याने खरिप हंगामही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.भिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले व पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, १९ जून रोजी संबंधित बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापक कुलकर्णी यांना नोटांचा हार घालून गांधीगिरी पद्धतीने स्वागत केले. पीककर्ज प्रकरणी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा शेतकरी हितार्थ स्वाभिमानी संघटना उद्रेक करेल, असा इशारा इंगोले यांनी दिला.