मानोरा येथील स्टेट बँकेच्या कामकाजावर नोकरदार, शेतकरीसह सर्वच त्रस्त आहे, बॅकेत साधा विड्रॉल सुध्दा करायचा असला तरी किमान एक दिवस लागतो. मागील सप्ताहात चक्क बॅकच बंद होती. ग्रामपंचायतीचे पंधराव्या वित्त आयोगाचे खाते बॅकेच्या असहकार्याला कंटाळून तालुक्याबाहेर कारंजा येथील बॅकेत उघडले, तर काही जणांनी तालुक्यातील फुलउमरी येथे जाऊन खाते उघडले. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ॠण समाधान योजनेंतर्गत वन टाईम सेटलमेंट पैशाचा भरणा करूनही अद्याप त्यांना पीक कर्ज मिळाले नाही. शिवाय खातेदारांना आपल्या खात्याचे स्टेटमेंट व बॅक पासबुकवर नोंदी सुध्दा होत नाही अशाच कामकाजामुळे सर्व त्रस्त असतानाच सोमवार २६ जुलै रोजी ग्रामसेवक अनिल सूर्य यांनी ग्रामपंचायतीचे खात्यावरील चेक मिळण्यासाठी एप्रिल महिन्यात अर्ज केला होता त्यांना चक्क जुलै महिन्यात बँकेचा धनादेश मिळाला. तीन महिन्यानी धनादेश मिळाल्याने ग्रामसेवक सूर्य यांनी सरळ बॅकेत जाऊन नव्याने रुजू झालेले शाखा व्यवस्थापक. पंकज शरणागत यांना पेढे देऊन गांधीगिरी केली.
----------
कोट: ग्रामपंचायतच्या कामकाजासाठी राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे, परंतु शहरात स्टेट बँकेच्या रुपाने एकमेव राष्ट्रीयकृत बॅक असून, या ठिकाणी कोणतेही काम वेळेवर होत नाही. कामे वेळेवर व्हावे, यासाठी आम्ही गांधीगिरी केली.
अनिल सूर्य, ग्रामसेवक
-----------
कोट: आपण गेल्या दोन -तीन दिवसांपूर्वीच येथे नव्याने रुजू झालो आहोत. मनुष्यबळ कमी असल्यामुळे अनेक कामे खोळंबली आहेत, केवळ दोनच कर्मचारी असल्यामुळे सर्वच कामे होणे शक्य नाही, बॅकेचे कामकाज सुरळीत करण्याचा माझा प्रयत्न राहील.
-पंकज शरणागत,
शाखा व्यवस्थापक स्टेट बँक मानोरा.