मालेगाव: गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवितानाच शांततेत उत्सव साजरा करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया गणेश मंडळांचा रविवारी जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मालेगावात यंदा अनेक मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया मंडळांचा सत्कार पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आला. यामध्ये पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून कुठलेही शस्त्र प्रदर्शन न करता विसर्जन मिरवणूक काढणाºया मालेगावच्या महात्मा फुले गणेश मंडळासह रक्तदान शिबिर व सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी कार्यशाळा घेणारे शिवराज गणेशोत्सव मंडळ, ग्रामीण भागात एक गाव एक गणपतीसह रक्तदान शिबिरे घेतल्याबद्दल पांगरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मेडशी येथील न्यू फ्रेंडस् गणेशोत्सव मंडळासह डोंगरकिन्ही आणि केळी येथील गणेशोत्सव मंडळाचा समावेश होता. या सर्व मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांना जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्याहस्ते सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मालेगावचे तहसीलदार राजेश वझीरे, मालेगावचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे, तसेच गणेश मंडळांच्यावतीने मोहन बळी, प्राचार्य प्रकाश कापूरे, शौकतभाई आदिंची उपस्थिती होती.