कामरगाव : कामरगाव व परिसरात एका गॅस कंपनी व वितरकाच्यावतीने दोन वर्षाअगोदरच्या गॅसधारकांच्या शेगडी व सिलिंडरची तपासणी करण्यात येत आहे. अव्वाच्या सव्वा फी आकारुन ग्राहकांची लूट केल्या जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून केल्या जात आहेत. गॅस सिलिंडर व शेगडीमधील दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी काही मुलांची नेमणुक करुन तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. यासाठी ग्राहकांकडून १५० रुपये फि आकारण्यात येत आहे. पंरतु याची नेमणुक केल्याची गावात तपासणीची महिती संबंधीत गावातील ग्रामपंचायत व पोलिस विभागाला देणे गरजेचे आहे. परंतु याबाबत या दोन्ही विभागाला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही. नेमणूक करण्यात आलेली मुले गॅसधारकांना विशेष महिलांना तपासणी न केल्यास गॅस सबसिडी बंद होईल, सिलेंडर भरुन मिळणार नाही अशी बतावणी करतांना दिसून येत आहेत. एकप्रकारे जबरदस्तीने तपासणी फि वसुल करत असल्याचा प्रकार कामरगावात घडत असल्याचे चित्र आहे. कंपनी व वितरक यांची मिलीभगत धोरणामुळे गॅसधारकांना लाखो रुपये वसुल करत असल्यामुळे तपासणीच्या नावाखाली लुट करीत असल्याची गॅसधारक ओरड करीत आहेत. याबाबत पुरवठा विभाग कारंजा यांच्याशी संपर्क होवु शकला नाही.
कामरगाव व परिसरात गॅसधारकांची शेगडी, सिलिंडर तपासणीच्या नावाखाली लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:03 PM
कामरगाव : कामरगाव व परिसरात एका गॅस कंपनी व वितरकाच्यावतीने दोन वर्षाअगोदरच्या गॅसधारकांच्या शेगडी व सिलिंडरची तपासणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देगॅस सिलिंडर व शेगडीमधील दुरुस्ती व मार्गदर्शनासाठी काही मुलांची नेमणुक करुन तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे. नेमणुक केल्याची गावात तपासणीची महिती संबंधीत गावातील ग्रामपंचायत व पोलिस विभागाला देणे गरजेचे आहे. परंतु याबाबत या दोन्ही विभागाला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही.