झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या गरीब कुटुंबातील अनिता बाजड यांच्या घरातील गॅस सिलिंडरने रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान अचानक पेट घेतला असता अनिता बाजड यांच्या भावाने लोणी बु. येथील पोस्ट मास्टर समाधान बोडखे यांना घटनेची माहिती देताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हनुमान बोडखे, अतिष मिटकरी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लोणी बु. येथील ‘फायरवॉल’च्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर टकले, पाणीपुरवठा कर्मचारी हनुमान बोडखे, डॉ. बिजोरे, ग्रामसेवक घुगे, समाधान बोडखे, अतिश मिटकरी, शामू राऊत, देवीदास मुळे यांनी मोलाचे सहकार्य केले. अमित पाटील खडसे यांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनीही अग्निशमन दलाची गाडी पाठविण्याकरिता प्रयत्न केले. परंतु, त्याअगोदरच आग आटोक्यात आली होती.
लोणी येथे गॅस सिलिंडरने घेतला पेट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 5:07 AM