लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम शहरात दोन ठिकाणी रविवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत ८७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषधी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अवैध धंद्याविरूद्ध विशेष मोहिम उघडली असून, वाशिम शहरातील काही ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना दिल्या होत्या. १२ आॅगस्ट रोजी विशेष पथक तयार करून शहरातील ड्रिमलॅण्ड सिटी कॉलनीतील प्रवीण घनश्यामदास मुंदडा यांच्या मालकीच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी एका खोलीत ६८ हजार ५१० रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आढळून आला. पंचासमक्ष सदर गुटखा ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर स्थानिक नालसाबपुरा येथील शे. समीर शे. जिब्राईल यांच्या राहत्या घरातून १८ हजार ८६५ रुपये किंमतीचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिबंधित केलेला गुटखा ताब्यात घेण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषधी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस कर्मचारी भगवान गावंडे, किशोर खंडारे, प्रेम राठोड, अश्विन जाधव, बालाजी बर्वे यांच्या पथकाने केली.
वाशिम येथे ८७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 2:30 PM
वाशिम - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम शहरात दोन ठिकाणी रविवारी सायंकाळी टाकलेल्या धाडीत ८७ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषधी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
ठळक मुद्दे वाशिम शहरातील काही ठिकाणी गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. शहरातील ड्रिमलॅण्ड सिटी कॉलनीतील प्रवीण घनश्यामदास मुंदडा यांच्या मालकीच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी एका खोलीत ६८ हजार ५१० रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.