लाभार्थी नागरिकांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले की, नगर परिषदमार्फत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. अंदाजे सन २०१९ साली घरकुल मंजूर झालेले लाभार्थी आहोत. काही लाभार्थींना सदर योजनेचा पहिला हप्ता अंदाजे नोव्हेंबर २०१९ मध्ये ४० हजार रुपये प्राप्त झालेला आहे. दुसरा हप्ता अंदाजे फेब्रुवारी २०२० मध्ये ४० हजार मिळाला. परंतु तिसरा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. अनेकवेळा त्यासंबंधी नगर परिषदेला विचारणा केली असता त्यासंबंधीचा निधी आज येईल उद्या येईल, अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. या सर्व प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन घरकुलाचे उर्वरीत हप्ते लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी कादीरभाई, नाझिम मोहम्मद,अभिषेक दंडे, मिर्झा रशीद बेग, संजय शर्मा, मनोज इंगळे, संजय कोराणे, मोहम्मद निसार, इम्तियाज अली खान, नाझीम खान, वाहेद खान, वसीम परवेझ आदींनी केली.
००००००
लाभार्थींना मानसिक व आर्थिक त्रास
घरकुल लाभार्थी अनेक दिवसांपासून भाड्याने दुस-याचे घरात राहत आहेत. उधार, व्याजाने पैसे आणून घरकुल पूर्ण केले. तिसरा हप्ता लवकरच मिळेल, आपण घरकुल पूर्ण करा असे सांगण्यात आले होते. पण अनेक दिवसांपासून तिसरा हप्ता मिळाला नाही व अनेक लाभार्थ्यांच्या अंगावर कर्ज झाले आहे. त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे लाभार्थ्यांनी निवदेनात म्हटले आहे.
150921\1754-img-20210915-wa0014.jpg
रखडलेला निधी देण्याच्या मागणीसाठी घरकुल लाभार्थ्यांचे उपोषण
मंगरुळपीर ता १५ /(ता प्र) पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थीचा रखडलेला उर्वरीत निधी लाभार्थ्यांना देण्यात यावा या मागणी करीता लाभार्थ्यांनी ता १५ पासून नगर पालिकेसमोर उपोषणास प्रारंभ केला आहे.
लाभार्थी नागरिकांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या नगर परिषद मार्फत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे व आम्ही अंदाजे सन २०१ ९ साली घरकुल मंजुर झालेले लाभार्थी आहोत . आमच्यापैकी काही लाभार्थीना सदर योजनेचा पहिला हप्ता अंदाजे नोव्हेंबर २०१ ९ मध्ये रु . ४०००० / - प्राप्त झालेला आहे . दुसरा हप्ता अंदाजे फेब्रुवारी २०२० मध्ये रु . ४०००० / - मिळाला परंतु तिसरा हप्ता अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे . अनेकवेळा त्यासंबंधी नगर परिषदेला विचारणा केली असता त्यासंबंधीचा निधी आज येईल उद्या येईल अशाप्रकारे उडवाउडवीची उत्तरे आम्हाला देण्यात येत आहेत . सदर प्रकरणी या योजनेतील लाभार्थी अनेक दिवसांपासून भाडयाने दुस - याचे घरात राहून दुस - यांचे जवळून उधार , व्याजाने पैसे आणून त्यांनी घरकुल पुर्ण केले . तिसरा हप्ता लवकरच मिळेल आपण घरकुल पुर्ण करा असे सांगण्यात आले होते . पण आज अनेक दिवसांपासून तिसरा हप्ता मिळाला नाही व अनेक लाभार्थ्यांच्या अंगावर कर्ज झाले आहे व लाभार्थी मानसिक व आर्थिक त्रास सहन करीत आहेत . तरी आता सर्व लाभार्थ्यांची त्रास सहन करण्याची मर्यादा संपलेली आहे . आपण या सर्व प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन घरकुलाचे उर्वरीत हप्ते लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात यावे.उपोषणकर्त्यांमध्ये कादीरभाई, नाझिम मोहम्मद,अभिषेक दंडे, मिर्झा रशीद बेग, संजय शर्मा, मनोज इंगळे, संजय कोराणे, मोहम्मद निसार, इम्तियाज अली खान, नाझीम खान, वाहेद खान, वसीम परवेझ आदींचा समावेश आहे.