सोयाबीनवरील विषारी घोणस अळीचा वाशिम जिल्ह्यातील माळशेलू शिवारात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, या अळीने रविवार १८ सप्टेंबर रोजी शेतात निंदण करणाऱ्या माळशेलू येथीलच एका महिलेस चावा घेतल्याने तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.विदर्भातील काही भागांत सोयाबीनवर घोणस नावाच्या बहुभक्षीय विषारी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ही अळी चावल्यास माणसाच्या त्वचेवरही परिणाम होतो. या अळीच्या अंगावरील बारीक काट्यांत विषग्रंथी असून, तो काटा माणसाच्या त्वचेत टोचून अळी विषारी रसायन शरीरात सोडते. त्यामुळे त्वचेवर परिणाम होऊ लागतो. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजारनजिकच्या माळशेलू येथी शिवारात या अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत असून, माळशेलू येथील कविता उदेभान चव्हाण (वय ३६) ही महिला शेतात निंदण करीत असताना घोणस अळीने तिला चावा घेतल्याने या महिलेस विषबाधा झाली आहेण सर्व प्रथम या महिलेवर शेलूबाजार येथील आरोग्यवर्धनी केंद्रात प्रथमोपचार करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी महिलेला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले आहे.
सोयाबीनवरील घोणस अळीने चावा घेतलेली महिला रुग्णालयात दाखल; वाशिममध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव
By दादाराव गायकवाड | Published: September 18, 2022 2:51 PM