गुजरात येथील नवसारी जिल्ह्यातील मैत्री ट्रस्ट व देसाई फाउंडेशन यांच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना टेस्ट किट प्रदान करण्यात आली. तसेच यावेळी एक स्वयंपूर्ण ऑर्केस्ट्रा असलेल्या मैत्री ट्रस्टच्या सहा जणांनी देशभक्ती व प्रेरणादायी गीतांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी कारंजा तहसील कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात तहसीलदार धीरज मांजरे यांनी मैत्री ट्रस्टचे अध्यक्ष गौतम मेहता यांच्या हस्ते तथा आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. बढे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना टेस्टिंग किटचा स्वीकार केला. यावेळी आशिष शर्मा यांनी प्रास्ताविकातून ट्रस्टच्या हेतूबाबतची माहिती विषद केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मेहता यांचा प्रा. शेख यांनी सत्कार केला, तर इतर मान्यवरांचा सत्कार प्रवीण साबू, प्रा. सी.पी. शेकुवाले, आरीफ पोपटे, पटवारी देवेंद्र मुकुंद व कारंजा न.प. आरोग्य विभागाचे राहुल सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहता यांनी केले. कार्यक्रमास हितेश शर्मा, दीपक पवार, अक्षय लोटे, अंकुश कडू, धनंजय राठोड, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच नगर परिषदचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
.......................
कोरोना काळात २० कोटींची मदत
गुजरात येथील देसाई फाउंडेशन विविध माध्यमांद्वारे महिला व बाल कल्याण तसेच नागरिकांच्या सहकार्यासाठी पुढाकार घेत आहे. कोरोनाच्या काळात फाउंडेशनने २० कोटी रुपयांची मदत केलेली आहे. मदतीचा लाभ सरळ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी थेट प्रशासनालाच विविध स्वरूपाची मदत केली जाते, हे विशेष.