आसोला खुर्द (जि. वाशिम ): येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस १६ जुलै रोजी पळवून नेल्याप्रकरणी, मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर मानोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानोरा पोलीस स्टेशन येथून ९ कि.मी. मीटर अंतरावर असलेल्या मौजे आसोला खुर्द येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला १६ जुलै रोजी मानोरा येथून फूस लावून पळवून नेले. हकीकत अशी की, आसोला खुर्द येथील कुमारिका मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय मानोरा येथे वर्ग बारावीमध्ये शिकत होती. तसेच ती आसोलावरून मानोरा येथे ऑटोने महाविद्यालयात येत होती. १६ जुलै रोजी दैनंदिन कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे ती ऑटोने आली असता सायंकाळपर्यंत घरी परत न आल्यामुळे आई-वडिलांनी तिची चौकशी केली. तसेच महाविद्यालयातसुद्धा विचारणा केली असता त्या दिवशी ती महाविद्यालयातसुद्धा आली नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ज्या ऑटोमध्ये महाविद्यालयासाठी गेली होती, त्या ऑटोचालक एकनाथ बंडू चव्हाण याच्या घरी चौकशी केली असता तोसुद्धा घरी नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. यावरून १७ जुलै रोजी सदर मुलीच्या वडिलाने मानोरा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविली की, माझ्या मुलीला एकनाथ बंडू चव्हाण, बंडू चव्हाण, कुसुम बंडू चव्हाण, अविनाश बंडू चव्हाण यांनी संगनमत करून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यावरून वरील आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३६६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहे.
मुलीस पळविले; चौघांवर गुन्हा
By admin | Published: July 18, 2016 2:43 AM