लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २८ मे रोजी जाहिर झाला असून, अमरावती विभागात टक्केवारीत यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८४.४७ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.२७ अशी आहे.यावर्षी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नावनोंदणी केली होती. यामध्ये ७७ हजार ६७२ मुले आणि ६४ हजार १२८ मुलींचा समावेश आहे. यापैकी १ लाख ४१ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, १ लाख २४ हजार ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६५ हजार ५५० मुले असून, उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८४.४७ अशी आहे तर ५८ हजार ४९९ मुली उत्तीर्ण असून ९१.२७ अशी टक्केवारी आहे. वाशिम जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ९०.१८ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९३.५५ अशी आहे. यवतमाळ जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८३.३३ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९०.६५, बुलडाणा जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८७.६७ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९२.४९, अमरावती जिल्ह्यात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ७९.७१ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ८९.७६ आणि अकोला जिल्हयात मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८३.९४ तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.४६ अशी आहे. दरवर्षीची परंपरा कायम राखत यावर्षीही निकालात मुलांपेक्षा मुलीच वरचढ ठरल्या आहेत.
बारावी निकाल: अमरावती विभागात मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 3:31 PM
अमरावती विभागात टक्केवारीत यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे.
ठळक मुद्दे मुलींची उत्तीर्ण टक्केवारी ९१.२७ अशी आहे.मुलांची उत्तीर्ण टक्केवारी ८४.४७ अशी आहे.