लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम ) - गावठी व देशी दारूचा महापूर असल्याने युवापिढी दारूच्या आहारी जात आहे तर अनेक महिलांच्या संसारात कलह निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर गावातून दारू हद्दपार करण्यासाठी डोंगरकिन्ही येथील महिला एकवटल्या असून, २५ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन देत दारूबंदीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली.निवेदनात म्हटले की, मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे गाावठी दारू मोठ्या प्रमाणात काढली जात आहे. देशी दारूची अवैध विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले, युवापिढी दारूच्या आहारी जात आहे तसेच पतीदेखील दारू पिऊन घरात धिंगाणा घालतात, मारहाण करतात, अशी आपबिती अनेक महिलांनी निवेदनाच्या माध्यमातून कथन केली. दारू विक्रेते व दारूचे सेवन करणाºया काही जणांना महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सेवाराम आडे यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा काहीच परिणाम न झाल्याने गावात खुलेआम अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात सापडत असून, संसारात कलह निर्माण होत आहेत. या पृष्ठभूमीवर डोंगरकिन्ही येथे दारूबंदी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, दारूविक्रेत्यांविरूद्ध ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. निवेदन देतेवेळी ग्रांम पंचायत सदस्या भागू सेवाराम आडे, कविता मधुकर आडे, कान्ता चव्हाण, शांता राठोड, ज्योती आडे, यमुना आडे, गंगा चव्हाण, द्रोपदा आडे, गीता राठोड, यशोदा पवार, मिनाक्षी राठोड आदि महिला उपस्थित होत्या. यावेळी सेवाराम आडे, रंगलाल आडे, सखाराम वाथे, अवी आडे, लोडु चव्हाण, शिवा जाधव, हिरालाल आडे, संजय आडे, प्रदीप गवई, नगरसेवक चंदू जाधव आदींची उपस्थिती होती. निवेदनावर २०० महिलांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी, राज्याचे गृहमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.
दारूबंदीसाठी डोंगरकिन्हीच्या महिला एकवटल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 7:25 PM
मालेगाव (वाशिम ) - गावठी व देशी दारूचा महापूर असल्याने युवापिढी दारूच्या आहारी जात आहे तर अनेक महिलांच्या संसारात कलह निर्माण होत आहे. या पृष्ठभूमीवर गावातून दारू हद्दपार करण्यासाठी डोंगरकिन्ही येथील महिला एकवटल्या असून, २५ सप्टेंबर रोजी मालेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना निवेदन देत दारूबंदीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली.
ठळक मुद्देठाणेदारांना निवेदन सहकार्य करण्याची मागणी