लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रूवारी-मार्च महिण्यात घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात कारंजा तालुक्याचा ९२.१५ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये चार शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी ८९.१८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी यामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. जाहीर झालेल्या निकालावरून नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींची सरशी पाहायला मिळाली. कारंजा तालुक्यात एकूण २५८९ विद्यार्थ्यांनी आवेदन फॉर्म भरले होते. त्यापैकी २५८८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यामधून २३८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९२.१५ टक्के अशी आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी तालुक्याच्या निकालात वाढ झाली आहे. कारंजा तालूक्यात ४ शहरी व २ ग्रामीण असे एकूण ६ परीक्षा केंद्रावर नियमित २५८९ विद्यार्थी परीक्षेला बसले. होते. त्यापैकी २५८८ विदयार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. त्यापैकी घोषित झालेल्या निकालानुसार कारंजा तालूक्याचा ९२.१५ टक्के निकाल लागला असून ५९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले; तर १०७२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ११०९ विद्यार्थी दितीय क्षेणीत, तर १४५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. जाहीर झालेल्या निकालानुसार कारंजा शहरातील जे.सी.ज्युनिअर कॉलेज, विद्याभारती ज्युनिअर सायन्स कॉलेज, जे.डी.चवरे ज्युनिअर कॉलेज, श्रीराम गुंजाटे ज्युनिअर कॉलेज व ब्लूचिप ज्युनिअर कॉलेज या चार शाळांचा १०० टक्के निकाल लागला, तर काही शाळांचा त्यापेक्षा कमी निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी आॅनलाइन निकाल जाणून घेतला. या निकालात कारंजा तालुक्यातील कि.न. महाविद्यालय कारंजा ८४.९३, मुलजीजेठा हायस्कुल कारंजा ९९.४५, जिल्हा परिषद ज्युनिअर कॉलेज कामरगाव ९४.३८, विद्याभारती कॉलेज कांरजा ९७.३३, जि.प.ज्युनिअर कॉॅलेज उंबर्डा बाजार ९३.५२, मुलजी जेठा नगर परिषद उर्द कारंजा ८०.२६, श्री मोहनलाल भन्सारी धजन बु.९५.१६, वसंत विद्यालय पोहा ९०.००, जे.सी.ज्युजअर कॉलेज कांरजा १०० टक्के, मोहनराल भन्साळी धनज एम.सी.व्ही.सी ८१.१५, वसंत विद्यालय पोहा एम.सी.व्ही.सी ९७.७७, ठाकरे विद्यालय मनभा ९१.९३, सोपीनाथ महाविद्यालय येवता ९४.५२, ठाकरे ज्युनिअर कॉलेज वाई ९१.६६, शोभनाताई चवरे विदयालय ९४.११, श्रीराम गुजांटे सायन्स कॉलेज कारंजा १०० टक्के, ब्यु चिप कॉन्व्हेंट १०० टक्के, जे.सी.ज्युनिअर कॉलेज एम.सी.व्ही.सी. ८९.८३ विदयाभारतीय सायन्स कॉलेज एम.सी.व्ही.सी कारंजा ९८.५७, नरसींग विदयालय धामणी ९८.८१, महात्मा गांधी विद्यालय लोहगाव ९०.८४, गुलाबनबी आजाद उर्दु हायस्कुल कारंजा ८७.०७, बाबासाहेब धाबेकर महाविदयालय काकडशिवनी ६८.०८, जे.डी.चवरे विद्यालय कारंजा १०० टक्के, राप्टसंत तुकडोजी महाराज विदयालय झोडगा ९७.७७, बाबासाहेब नाईक विद्यालय प्रिपी फॉरेस्ट ८७.९३, सुलभाताई इंगोले विद्यालय वापटी कुपटी ९७.७७ याप्रमाणे निकाल जाहीर झाला.
कारंजा तालुक्यात यंदाही मुलींचीच सरशी!
By admin | Published: May 31, 2017 2:04 AM