लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : येथील भारत माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सीमेवर तैनात असलेल्या व देशरक्षणाचा वसा घेतलेल्या सैनिकांना रक्षा बंधनचे औचित्य साधून राख्या पाठविल्या आहेत.रक्षा बंधन या सणाचे औचित्य साधून भा.मा. कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी ११00 राख्या सीमेवरील सैनिकांना पाठविण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार या शाळेने वाशिम येथील सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून सैनिकांसाठी राख्या पाठविण्यात आल्या. प्राचार्या रावसाहेब यांच्या सहयोगातून व वेळोवेळी मिळालेल्या प्रेरणेतून हा उपक्रम साकारल्याचे मत विद्यार्थिनींनी व्यक्त केले. रक्षाबंधनाच्या या आगळयावेगळया कार्यक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी विद्यार्थिनींना अशा उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले.या कार्यक्रमाला प्राचार्य रावसाहेब, पर्यवेक्षक पवार, प्रा.मोरे, सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांना पाठविल्या राख्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:24 AM
रिसोड : येथील भारत माध्यमिक कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी सीमेवर तैनात असलेल्या व देशरक्षणाचा वसा घेतलेल्या सैनिकांना रक्षा बंधनचे औचित्य साधून राख्या पाठविल्या आहेत.
ठळक मुद्देसैनिकांप्रती आदर ११00 राख्यांचा समावेश