राजरत्न सिरसाटअकोला, दि. १२: शासनाने वन्यजीव विभागामार्फत राज्यात ह्यभाकड गायी द्या; दुधाळ जनावरे घ्याह्ण ही योजना सुरू केलेली आहे; पण निधीचा अभाव आणि शेतकर्यांमध्ये जनजागृती होत नसल्याने ही योजना कागदावरच आहे.राज्यातील वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातील शेतकरी, पशुपालक त्यांच्याकडील भाकड जनावरे जंगलात चरायला सोडून देतात. यातील अनेक जनावरांना खुरी रोगासह वेगवेगळे आजार होतात. ही जनावरे वन्य प्राणी भक्षण करीत असल्याने वन्य प्राण्यांना साथरोगांचा धोका असतो. हे टाळण्यासाठी शासनाने २00६ मध्ये ह्यभाकड जनावरे द्या आणि दुधाळ जनावरांसाठी अनुदान घ्याह्ण ही योजना सुरू केलीआहे. वन्यजीव विभागामार्फत राबविण्यात येणार्या या योजनेला सुरुवातीच्या एक-दोन वर्षात शासनाकडून निधीही उपलब्ध करण्यात आला; परंतु आता नियमित निधी उपलब्ध होत नसल्याने या योजनेवर पशुपालकांकडून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. या योजनेसाठी शासनाने नियमित निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे.भाकड जनावरे द्या; दुधाळ जनावरे घेण्यासाठी अनुदान घ्या ही योजना सुरू आहे. शासनाकडून जसा निधी प्राप्त होतो, तो निधी या योजनेवर खर्च केला जातो.- रमेशप्रसाद दुबे,जिल्हा वन अधिकारी,यवतमाळ.
भाकड गायी द्या; दुधाळ जनावरे घ्या कागदावरच !
By admin | Published: August 13, 2016 12:40 AM