निवेदनात नमूद आहे की, जगात कोरोनाने सर्वत्र थैमान माजविले असताना वैद्यकीय क्षेत्राला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यात येत आहेत. राज्यात सर्वत्र कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) च्या जागा निघाल्या असून त्यावर बी.ए.एम.एस व बी.एससी. नर्सिग पदवी पात्रताधारकांना घेण्यात आले आहे. तथापि, इतर राज्यात सीएचओ म्हणून जीएनएम पदवीकाधारकांना संधी देण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात अल्टरनेटीव्ह मेडिसीन क्षेत्रातील डॉक्टर आणि कम्युनिटी मेडिकल सर्व्हिस, कम्युनिटी मेडिकल इसेंशियल ड्रग्स पदवीधारकांना शासकीय सेवेत सामावून घेतल्यास कमी मानधनात ग्रामीण भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळेल. यासोबतच १०८ या रुग्णवाहिकेवर सुध्दा वरील पदवीधारकांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून संधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:38 AM