वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, रेल्वे स्टेशनवर फारशी गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीत २० रुपयांनी वाढ करीत आता ३० रुपयाला प्लॅटफॉर्म तिकीट मिळत आहे. करार संपुष्टात आल्याने पार्किंगची सुविधा बंद आहे.
दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या होत्या. वाशिममार्गे सहा पॅसेंजर आणि आठपेक्षा अधिक विशेष रेल्वेगाड्या धावतात. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे. प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबत येणाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. आता प्लॅटफॉर्मचे तिकीट ३० रुपयांत पडत असल्याने कुणाला रेल्वेस्टेशनवर सोडायला जाणे किंवा घेऊन येणे महागात पडणार आहे.
००००००००००००००
असे वाढले दर २०१९ २०२० २०२१
प्लॅटफॉर्म तिकीट १० १० ३०
रेल्वे पार्किंग २० ३० --
0000000000000
्रपार्किंगची सुविधा बंद
रेल्वे स्थानक परिसरात करार तत्त्वावर पार्किंगची सुविधा आहे. येथे तासानुसार दुचाकी, चारचाकीला दर आकारले जातात. दरवर्षी कराराचे नूतनीकरण केले जाते. यंदा कराराचे नूतनीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगची सुविधा तूर्तास तरी बंदच आहे. कराराचे नूतनीकरण झाल्यानंतर पार्किंगची सुविधा सुरू होण्याचे संकेत आहेत.
००००००००००००
प्लॅटफॉर्म तिकिटातून फारशी कमाई नाही
वाशिम रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म तिकिटातून रेल्वे प्रशासनाला फारशी कमाई नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. प्रवाशांसोबत येणाऱ्यांची संख्यादेखील फारशी नसते. २०१९ मध्ये २४०० रुपये, २०२० मध्ये ३०० रुपयाच्या आसपास प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री झाली होती.
००००००००००००००००००
प्लॅटफॉर्म तिकीट आवश्यक
स्टेशनमास्तर कोट
कोरोनाकाळात प्रवाशांसोबत रेल्वे स्टेशनवर येणाऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीत सगळीकडेच वाढ झाली आहे. वाशिम येथेही प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढली असून आता ३० रुपये झाली आहे. प्लॅटफॉर्म तिकीट असेल तरच प्रवाशांसोबत इतरांनी यावे.
- टी.एम. उजवे
स्टेशन मास्तर, वाशिम