लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक भक्तिधाम, राधाकृष्ण मंदिर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ ऑगस्ट रोजी o्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने o्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.येथे १४ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत राजेश सोमाणी महाराज यांच्या वाणीतून कृष्ण लीलामृत व जन्मावर भजन झाले. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती लाभली होती. तसेच १५ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता विठ्ठल महाराज इरळा यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी १२ ते ४ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य असा तिरंगाही यावेळी साकारण्यात आला होता. संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान बालकांना o्रीकृष्णांची भूमिका साकारली होती, तर महिलांनीही डीजेच्या तालावर नृत्य करून मिरवणुकीला रंगत आणली होती. o्रीकृष्णांच्या गीतांनी, भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बालगोपाळाच्या हाताने दहीहंडी फोडल्यानंतर भाविकांना गोपालकाल्याचे वाटप करण्यात आले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासठी o्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीने परिo्रम घेतले.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
गोकुळाष्टमी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:05 AM
वाशिम : स्थानिक भक्तिधाम, राधाकृष्ण मंदिर तिरुपती सिटी या वसाहतीमध्ये १४ व १५ ऑगस्ट रोजी o्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने o्रीकृष्ण जन्मोत्सव, गोपालकाला व भजनसंध्येचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देभजनसंध्या व गोपालकाला बालगोपालांचा समावेश