लाेकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दिवाळीनंतर सोने, चांदीच्या दरात घसरण येत असल्याचे दिसून येते. सोन्याचे प्रती तोळा दर हे ५२ हजारावरून ४९ हजारावर, तर चांदीचे प्रती किलो दर ६६ हजारावरून ६० हजारापर्यंत खाली आले.
‘कोरोना’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, डॉलरचे घसरणारे मुल्य, शेअर बाजारातील अस्थिरता यामुळे गुंतवणूकदार हे सुरक्षित व खात्रीलायक गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदीकडे वळले होते. त्यामुळे सोने, चांदीच्या दरात वाढ गेली. दिवाळीनंतर मात्र सोने चांदीच्या दरात घसरण येत असल्याचे तुर्तास दिसून येते. कोरोनामुळे अर्थव्यवस्था प्रभावित होत असून, शेअर बाजारात अस्थिरता आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुकीचा चांगला आणि खात्रीलायक पर्याय म्हणून गुंतवणुकदार हे सोने, चांदीमध्ये गुंंतवणूक करीत असल्याने मध्यंतरी सराफा बाजारात चांगलीच तेजी आली होती. अनलॉकच्या टप्प्यात बाजारपेठ पूर्ववत झाली असून, उलाढालही वाढत आहे. त्यामुळे गुंतवणूक म्हणून अन्य क्षेत्रालाही प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. दिवाळीदरम्यान सोने प्रति तोळा ५२ हजार रुपयाच्या आसपास तर चांदी प्रति किलो ६६ हजाराच्या आसपास होते. दिवाळीनंतर सोने, चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे दिसून येते. २८ नोव्हेंबर रोजी सोने प्रति तोळा ४८ हजार ७०० रुपये तर चांदी प्रति किलो ६० हजार रुपये असे दर होते. गत १५ दिवसात सोन्याच्या प्रति तोळा दरात सव्वा तीन हजार रुपये तर चांदीच्या प्रति किलो दरात सहा हजार रुपये घट झाली.