लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (जि. वाशिम): दोन सराफा व्यावसायिकांवर चाकूने हल्ला करुन दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्याजवळील रोख आणि सोने, चांदीच्या दागिण्यांसह सात लाखांचा ऐवज पळविला. ही घटना मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केनवड येथे शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेले गणेश पांडूरंग लहाने, दिलीप सिताराम मैंद, हे केनवड येथे सराफा व्यवसाय करतात. शनिवार २९ जुलै रोजी संध्याकाळी दुकान बंद करून डोणगावकडे जात असताना केनवड येथील पुलाजवळ दुचाकीवरील दोन चोरट्यांनी त्यांना अडविले. त्यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांच्याजवळील २५० ते ३०० ग्रॅम सोने, ६० हजार रुपये रोख असा एकूण सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी गणेश पांडुरंग लहाने यांच्यावर चाकून चार ते पाच वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी वृत्त लिहित असेपर्यंत शिरपुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
चाकू हल्ला करून सराफा व्यावसायिकांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 2:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (जि. वाशिम): दोन सराफा व्यावसायिकांवर चाकूने हल्ला करुन दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्याजवळील रोख आणि सोने, चांदीच्या दागिण्यांसह सात लाखांचा ऐवज पळविला. ही घटना मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या केनवड येथे शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेले गणेश पांडूरंग लहाने, ...
ठळक मुद्देसात लाखांचा ऐवज लंपास:वाशिम जिल्ह्यातील घटना, एक गंभीरव्यापारी बुलडाणा जिल्ह्यातील