लोकमत न्युज नेटवर्ककोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाय योजनांतर्गत शासनाने संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी जारी कली आहे, तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधानसचिवांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ पासून लागू केला असून, या कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक उपाय योजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकारी घोषीत केले आहे. त्यामुळेच वाशिम जिल्ह्यात हमीभावाने शेतमाल खरेदी बंद केली आहे. तथापि, पणन सचांलक पुणे यांच्या कार्यालयीन परिपत्रकान्वये कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होणार नाही, याची दक्षता घेऊन जिवनावश्यक शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही व उपाय योजना करण्याबाबत कळविले आहे, तसेच केंद्रीलय गृहमंत्रालयाच्या आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापनाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये शासकीय हमीभाव खरेदीस सुट देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शासकीय हमीभाव केंद्रांवर सामाजिक अंतराचे पालन (सोशल डिस्टंस) व कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होणार नाही, यासाठी करावयाच्या उपायांची तरतूद करून हमीभाव खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय झाला असून, अकोला आणि वाशिम येथील जिल्हा उपनिबंधक यांनी नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना १ एप्रिल रोजी पत्र देऊन कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी घेऊन हमीभाव खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. तथापि, हमीभावाने शेतमालाची खरेदी अद्याप सुरू झाली नाही. .
पणन संचालकांच्या आदेशानंतरही शासकीय खरेदी केंद्र बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 6:31 PM