तक्रारीनुसार भोयनी येथील रास्त धान्य दुकानदार दशरथ रायसिंग चव्हाण यांनी सीताराम सवाई राठोड या १३ जानेवारी २०१२ या वर्षी मृत्यू पावलेल्या नागरिकाच्या नावाने १८ जुलै २०२१ पर्यंत शासकीय गोदामातून शासनाची फसवणूक करून धान्याची उचल केलेली आहे.
स्व. सीताराम राठोड यांच्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे गावातील इतरही तब्बल चोवीस मयतांच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शासनाला लाखो रुपयांचा चुना रास्त धान्य दुकानदाराने लावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
भोयनीच्या रास्त धान्य दुकानातील अनियमिततेची गावातील सुदाम श्यामराव आडे आणि शांताबाई काशीराम चव्हाण यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीवरून तालुका प्रशासनाने केलेल्या चौकशीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रास्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केलेला असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात उपायुक्त पुरवठा विभाग अमरावती यांच्याकडे पुनर्निरीक्षणासाठी अपील केल्याने प्रकरण प्रलंबित आहे.