लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव पंचायत समितीमध्ये गत काही दिवसांपूर्वी बसविण्यात आलेली सॅनिटायझर मशिन सद्यस्थितीत बंद पडली आहे. इतरांना हात वारंवार धुण्याच्या सल्ला देणाºया प्रशासकीय कार्यालयातील सॅनिटायझर मशिन बंद असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रशासनाने बहूतांश शासकीय कार्यालयामध्ये सॅनिटायझा मशिन बसविण्याचे आदेश दिले. सुरूवातीला शासकीय कार्यालयांनी त्या आदेशाचे तंतोतत पालनही केले. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसताच शासकीय कार्यालयातील बहुतांश सॅनिटायझर मशिन बंद अवस्थेत दिसत आहेत. मालेगाव पंचायत समितीमध्ये मशीन बंद आहे तर नगर पंचायतमध्ये मशिनच नाही. कोरोनाच्या विळख्यात कोरोना योध्दा म्हणून महसूल, पोलिस अधिकारी व कर्मचारी, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिकांनी कार्य केले व आताही करीत आहेत. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग व हात वारंवा धुणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. दुसरीकडे प्रशासकीय कार्यालयातच सुविधांचा अभाव दिसून येतो. येथील पंचायत समिती कार्यालयातील सॅनिटायझर मशिन बंद आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सर्व शासकीय कार्यालयात सॅनिटायझर मशिन, सॅनिटायझरची सुविधा असणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयातील सॅनिटायझर मशीन बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 4:32 PM