लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर होणार नाही, या दृष्टिने जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, असा राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले.स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी, लहान मुले प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. दुसºया दिवशी हे ध्वज इतरत्र टाकले जातात. प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातफेृ करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना करणे हा दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरीय यंत्रणेकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे गोळा केलेले राष्ट्रध्वज तालुका पातळीवर तहसीलदर कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था, पालक व सर्वसामान्य नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले. कार्यालये, प्रतिष्ठाने, प्राधिकरणे व इतर संस्थांनी ध्वजारोहणाप्रसंगी ध्वज वापराबाबत भारतीय संहितेमध्ये दिलेल्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर प्रशासनाचा 'वॉच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 6:10 PM
वाशिम : प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वजाची विक्री व वापर होणार नाही, या दृष्टिने जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, असा राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले.
ठळक मुद्दे प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे आपल्या हातून न कळत आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातफेृ करण्यात आले.