सुनील काकडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशभरातील ११५ जिल्ह्यांचा मानव निर्देशांक तुलनेने कमी असून संबंधीत जिल्हे प्रगत करण्यासाठी शासनाकडून ‘कन्वर्जन्स इन्टिग्रेशन अँण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’, हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून यामाध्यमातून मानव निर्देशांक उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मानव निर्देशांकात घसरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या सहकार्याने नीती आयोगाने कालबद्ध विकासाचे नियोजन केले आहे. याअंतर्गत मागास जिल्ह्यांमधील लोकांचे जीवनमान उंचावणे, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगाराच्या सुविधा तसेच विकासाच्या दृष्टीकोनातून आवश्यक ठरू पाहणार्या योजनांची आखणी केली जाणार आहे. यासंदर्भातील जबाबदारी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांकडे सोपविण्यात आली असून संबंधित अधिकारीवर्गाने त्यादृष्टीने जिल्हांतर्गत भेटीचे सत्र देखील सुरू केले आहे. दरम्यान, राज्यात आजमितीस मानव निर्देशांक कमी असणारे १२ जिल्हे आहेत. मात्र, नंदूरबार, उस्मानाबाद, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांवर विकासाच्या दृष्टीने विशेष फोकस केला जाणार आहे.
मागास जिल्हे प्रगत करण्यावर शासनाचा भर; वाशिमसह ४ जिल्ह्यांचा समावेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:43 AM
वाशिम : देशभरातील ११५ जिल्ह्यांचा मानव निर्देशांक तुलनेने कमी असून संबंधीत जिल्हे प्रगत करण्यासाठी शासनाकडून ‘कन्वर्जन्स इन्टिग्रेशन अँण्ड फोकस्ड अटेंशन टू बॅकवर्ड डिस्ट्रिक्टस’, हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, गडचिरोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला असून यामाध्यमातून मानव निर्देशांक उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठळक मुद्देमानव निर्देशांक उंचावण्याचा प्रयत्न