लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या खरेदी-विक्री किंवा इतर संस्थांना या प्रक्रियेत शेतमालाचा दर्जा ठरविण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रेडरचे पारिश्रमिक किंवा मोबदला स्वत: अदा करावा लागणार असून, याची तयारी असलेल्या संस्थांना त्याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात रितसर अर्जही सादर करावे लागणार आहेत.नाफेड अंतर्गत येणाऱ्या वाशिम आणि अकोला जिल्ह्यात १३ हजारांहून अधिक शेतकºयांनी सोयाबीनच्या विक्रीसाठी नाफे डकडे अर्ज सादर केले आहेत. नाफेडसाठी कमीशन तत्त्वावर सोयाबीन खरेदीस तयार असलेल्या संस्थांनी प्रशासनाकडे त्यासाठी अर्जही केले आहेत. तथापि, काही ठिकाणी ग्रेडरची समस्या असल्याने खरेदी सुरू होऊ शकलेली नाही. नाफेडच्यावतीने एफएक्यू दर्जाचे सोयाबीनच हमीभावात खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठी ग्रेडरची आवश्यकत आहे. तथापि, ग्रेडरचा खर्च नाफेड प्रशासन करणार नसून, हा खर्च खरेदी करणाºया संबंधित संस्थेला स्वत: करावा लागणार आहे. त्याबाबत नाफे डच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी संस्थाना माहिती देऊन तयारीनुसार अर्ज सादर करण्याची सुचनाही केली आहे. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर नाफेडच्यावतीने फे डरेशनचे ग्रेडर खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी देवेंद्र शेकोकार यांनी सोमवारी दिली.
नाफेड खरेदीसाठी संस्थांना द्यावे लागणार ग्रेडरचे पारिश्रमिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 6:02 PM