लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. यात ४,३२२ उमेदवारांनी ४,३९४ अर्ज दाखल केले. यानंतर ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत १३६ अर्ज छाननीत बाद झाले हाेते. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (३० डिसेंबर) २९ डिसेंबरपर्यंत १४८६ जागांसाठी ४३२२ उमेदवारांनी ४३९३ अर्ज सादर दाखल केले. यामध्ये वाशिम तालुक्यातील ७२०, रिसोड तालुक्यातील ९८४, मालेगाव ८६८, मंगरूळपीर ६२६, कारंजा ६०४ आणि मानोरा तालुक्यातील ५९१ उमेदवारी अर्जांचा समावेश होता. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक विभागाकडून ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अर्ज छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत मानाेरा व कारंजा तालुकयातील २३ अर्ज बाद ठरले. यामध्ये मानाेरा तालुक्यातील १७, कारंजा ६, मालेगाव २४, वाशिम ३४, रिसोड ४३ तर मंगरूळपीर तालुक्यात ९ वाजेपर्यंत १२ अर्ज बाद झाले होते. ईतर तालुक्यातील अर्ज छानणी सुरु हाेती.
आता लक्ष माघारीकडे जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया ३१ डिसेंबर रोजी पार पडल्यानंतर आता नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ४ जानेवारी रोजी दुपार ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार असून, नामनिर्देशन मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार आहेत. ते स्पष्ट होऊ शकेल. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ग्रामस्थांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे उमेदवारांच्या माघारीकडे लक्ष लागले आहे.
४ जानेवारीला उमेदवार यादी हाेणार प्रसिध्दजिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींसाठी ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेची अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. आवश्यकता असल्यास १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. तसेच १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार असून, २१ जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.