शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

Gram Panchayat Election : निवडणूक चिन्हांमध्ये फळ, भाजी, चार्जर अन् माउस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 10:37 AM

Gram Panchayat Election: भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देयंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. १५० चिन्हांऐवजी १९० निवडणूक चिन्हे ठेवले जाणार आहेत.त्याची यादी निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवारांकडून विविध स्वरूपांतील चिन्हांची मागणी केली जाते. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाने यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ४० चिन्हांची वाढ केलेली आहे. त्यात भाजीपाला, मोबाइलचे चार्जर, संगणकाचे माउस अशाही काही चिन्हांचा समावेश आहे. जिल्ह्यात यंदा १६२ ग्रामपंचायतींमध्ये येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक असून, छाननी प्रक्रियेनंतर ४ हजार २५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असून, चिन्ह वाटपाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आवडीप्रमाणे चिन्ह घेण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड होत असे. हा प्रश्न आता निवडणूक आयोगाने निकाली काढला असून पूर्वीच्या १५० चिन्हांऐवजी १९० निवडणूक चिन्हे ठेवले जाणार आहेत. त्याची यादी निवडणूक कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. 

अशी आहेत चिन्हे!  वाढलेल्या ४० निवडणूक चिन्हांमध्ये संगणकाचा माउस, संगणक, एयर कंडिशनर, लॅपटॉप, सीसीटीव्ही कॅमेरा, हेडफोन, लाइटर, मोबाइल चार्जर, डिश अँटेंना, टीव्हीचा रिमोट, पेन ड्राइव्ह, इंजेक्शन, स्वीच बोर्ड अशी डिजिटल साधने यांसह  हेल्मेट, नेलकटर, मिक्सर, माइक, दुर्बीण, कढई, ब्रेड टोस्टर, उशी, फ्रीज, स्टॅपलर, सेफ्टी पीन अशा घरगुती व स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. सोबतच भेंडी, मका, वाटाणे, फुलकोबी, ढोबळी मिरची, आद्रक, हिरवी मिरची, अननस, कलिंगड, द्राक्षे, पेरू, नारळ अशा काही चिन्हांचाही समावेश करण्यात आला.

वाढलेल्या ४० चिन्हांची यादी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडे पाठविण्यात आलेली आहे. एका मतपत्रिकेवर एकच चिन्ह पुन्हा येणार नाही, असा नियम निवडणूक आयोगाने घालून दिलेला आहे. त्याचे पालन केले जाणार आहे. तसेच कुठल्याही उमेदवारास चिन्ह मागण्याचा अधिकार नाही; पण समन्वयातून तहसीलदारांशी संपर्क साधून ही अडचण दूर होऊ शकते. - सुनील विंचनकर,  जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwashimवाशिमElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग