शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

Gram Panchayat Election : आज होणार लढतीचे चित्र स्पष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 10:48 AM

Gram Panchayat Election: ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. १४८७ जागेसाठी एकूण ४२५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरूळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत ४२४२ उमेदवारांनी ४३९० अर्ज सादर दाखल केले होते. छाननीत ८९ उमेदवारांचे १३४ अर्ज बाद झाल्याने ४१५३ उमेदवारांचे ४२५६ अर्ज कायम राहिले. एकूण १४८७ जागेसाठी ४२५६ उमेदवारांचे अर्ज दाखल असल्याने अनेक ठिकाणी तिरंगी लढतीचे संकेत आहेत. दरम्यान, बंडखोरी टाळण्यासाठी असंतुष्टांना खूश करण्याचा प्रयत्न पॅनलप्रमुखांकडून होत असल्याचे दिसून येते. उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी विविध प्रलोभणेही देण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने राजकीय आखाडा चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. या ग्रामपंचायतींकडे विशेष लक्षवाशिम तालुक्यातील काटा, अनसिंग, पार्डीटकमोर, तामशी, तोंडगाव, वारा जहॉंगीर, सावरगाव जिरे, वारला, रिसोड तालुक्यातील रिठद, चिखली, कवठा, गोभणी, मांगूळझनक, केनवड, वाकद, हराळ, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, किन्हीराजा, जऊळका रेल्वे, चिवरा, मेडशी, तिवळी, डोंगरकिन्ही, मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ, शेलुबाजार, वनोजा, सायखेडा, मानोरा तालुक्यातील कारखेडा, इंझोरी, वाईगौळ, गादेगाव, कारंजा तालुक्यातील कामरगाव, उंबर्डाबाजार, धामणीखडी आदी ग्रामपंचायतींमधील प्रमुख लढती कशा राहतील, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.आज निवडणूक चिन्हांचेही वाटप होणारसोमवार, दि. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ आहे. सोमवारी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. मतदारांना सहजरीत्या समजू शकेल, आकर्षित करू शकेल असे निवडणूक चिन्ह मिळावे, याकडे उमेदवारांचा कल असल्याची चर्चा आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक