वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार मासिक सभा होत नसल्याने ग्रामविकासाला ‘ब्रेक’ लागला आहे. योजनांतर्गत कामकाजाची गती देखील कमी असल्यामुळे अपेक्षित विकास साध्य होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो. परिणामी, प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात समसमान लक्ष पुरवून ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये आजमितीस केवळ ३०३ ग्रामसेवक कार्यरत असून मोठ्या प्रमाणातील या अनुशेषामुळेच ग्रामविकासाचा बोजवारा उडत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर कुठल्याही यंत्रणेच्या हस्तक्षेपाविना निधीचा विनियोग आणि योजनांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतींकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र, ग्रामविकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे. याच कारणांमुळे अनेक ग्रामपंचातींच्या मासिक सभाच होत नसल्यानेही विकासाला बहुतांशी ‘ब्रेक’ लागल्याचे दिसून येत आहे.
ग्रामपंचायतींचा मासिक सभेला कोलदांडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 5:31 PM
वाशिम : जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये तेवढेच ग्रामसेवकांची नेमणूक असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ३०३ ग्रामसेवकच कार्यरत असल्याने योजनांतर्गत कामांच्या अंमलबजावणीवर विपरित परिणाम होत आहे.
ठळक मुद्देअनेक ग्रामपंचायतींमध्ये कायमस्वरूपी सचिव नसून एकाच ग्रामसचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला जातो.निधीचा योग्य विनियोग करण्याकामी आवश्यक ग्रामसेवकांची पदेच रिक्त असल्याने शासनाच्या मूळ उद्देशांना हरताळ फासला जात आहे.