लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे विहीरी करीता पंचायत समिती वाशिम येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंचानी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केले आहे.सन २०१६-१७ चे खरीप हंगामामध्ये वाशिम तालुक्यात ग्रामीण भागामध्ये पाउस कमी प्रमाणात पडला आहे. तसेच पावसाच्या खंडामुळे ग्रामीण भागात यावर्षी पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या गावांमध्ये पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे , अशा गावचे ग्रा.पं. कडून म.ग्रा.रो.ह.यो मधून सार्वजनिक विहीरी करीता पं.स.वाशिम येथे शासन निर्णयाचे नियमानुसार ग्रामसभा ठराव, या पुर्वी सार्वजनिक विहीर अथवा ट्रनर कोणत्याही योजनेमधून काम झालेले नाही असे ग्रामसचिवाचे प्रमाणपत्र, सन २०१७-१८ चे म.ग्रा.रो.ह. यो. च्या कृती आराखडयात असल्याचे ग्रामसचिव यांचे प्रमाणपत्र , स्थळदर्शक नकाशा, ई क्लास सरकार जमीन असल्यास ७/१२, ८ अ , खाजगी जमीन असल्यास ग्रा.पं.चे सरपंच , ग्रामसचिव यांचे नावे १०० रु. स्टॅम्प पेपरीवर दानपत्र इत्यादी कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन पं.स.उपसभापती मधुबाला चौधरी केले. गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेण्याचे आवाहन भोने व चौधरी यांनी केले आहे.
ग्रामपंचायतींनी सार्वजनिक विहिरीकरिता प्रस्ताव सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:26 PM
वाशिम : महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजना नरेगा अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाण्याचे विहीरी करीता पंचायत समिती वाशिम येथे ग्रामपंचायत सचिव व सरपंचानी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती गजानन भोने व उपसभापती मधुबाला सुभाषराव चौधरी यांनी केले आहे.
ठळक मुद्देवाशिम पंचायत समिती सभापती व उपसभापतींचे आवाहन