शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

 वृक्ष लागवड मोहिमेसाठी ग्रामपंचायतींना देणार प्रोत्साहन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 3:53 PM

वाशिम : आगामी जुलै महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम वाशिम जिल्हा परिषदेतर्फे राबविला जाणार आहे.

ठळक मुद्दे सहा तालुक्यांतील गुणानुक्रमे प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात येईल.वाशिम जिल्ह्याला १३ लाख ८८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविणारी वाशिम जिल्हा परिषद ही अमरावती विभागात पहिली ठरणार असल्याचा दावा करण्यात आला.

वाशिम : आगामी जुलै महिन्यात लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम वाशिम जिल्हा परिषदेतर्फे राबविला जाणार आहे. सहा तालुक्यांतील गुणानुक्रमे प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची यासाठी निवड करण्यात येईल. वृक्ष लागवड मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविणारी वाशिम जिल्हा परिषद ही अमरावती विभागात पहिली ठरणार असल्याचा दावा करण्यात आला.येत्या १ ते ३१ जुलैदरम्यान महाराष्ट्रात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार वाशिम जिल्ह्याला १३ लाख ८८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांचादेखील सक्रिय सहभाग राहणार आहे. वृक्षारोपण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी गटविकास अधिकाºयांचा आढावा घेऊन वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टांबाबत सूचना दिल्या होत्या. स्वतंत्र परिपत्रक काढून वृक्ष लागवडीची जबाबदारी गटविकास अधिकाºयांवर सोपविली असून, ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येएवढी झाडे लावण्याचा निर्धार केला. वृक्ष लागवडीसंदर्भात स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी यावर्षीपासून अनोखा उपक्रम राबविला जाणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त झाडे लावणाºया ग्रामपंचायतींचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी सहा तालुक्यांतील गुणानुक्रमे प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींची निवड केली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे, वृक्ष दिंडी काढून प्रौढ व्यक्तींचा सहभाग वाढविणे असे उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद