लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : प्रलंबित मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने जिल्ह्यात ९ जुलैपासून असहकार आंदोलन तर २२ आॅगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातही एकही मासिक सभा तसेच ग्रामसभा झाली नसल्याने गावविकासाला खिळ बसली.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करणे, वेतन त्रूटी दूर करणे, जूनी पेन्शन योजना लागू करणे, अतिरिक्त कामे कमी करणे, निलंबित केलेल्या ग्रामसेवकांना ९० दिवसांच्या आत सेवेत घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने विविध ट्प्प्यात आंदोलन केले. परंतू, शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे अधिक आक्रमक होत ग्रामसेवक संघटनेने असहकार, धरणे आंदोलन, मोर्चा आणि २२ आॅगस्टपासून कामबंद केले. त्यामुळे गावपातळीवरील कामकाज ठप्प झाले आहे. दप्तर कुलूपबंद करून त्याच्या चाव्या सर्व ग्रामसेवकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे सोपविल्या. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर ग्रामसेवक संघटना ठाम आहे. यामुळे गाव विकासाला खिळ बसली आहे. शिवाय आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभाही सचिवांच्या अनुपस्थितीमुळे स्थगित कराव्या लागल्या. आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभेत विशेषत: तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडीचा विषय चर्चेला येत असल्याने या ग्रामसभेला ग्रामपातळीवर विशेष महत्व असते. परंतु आॅगस्ट महिन्यात १५ आॅगस्ट रोजी तालुक्यातील काही मोजक्याच ग्राम पंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या. तर अनेक ग्राम पंचायतीत कोरम अभावी त्या स्थगित करून बहुतांश ग्रामपंचायतीत २९ आॅगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन केले होते. परंतु सदर ग्रामभेस ग्रामसचिवच उपस्थित नसल्याने याही ग्रामसभा स्थगित कराव्या लागल्या. त्यामुळे शासनाने वरिष्ठ पातळीवर ग्रामसेवकांच्या मागण्याविषयी ठोस निर्णय घेऊन ग्रामविकासाला बसलेली खिळ थांबवावी अशी मागणी ग्रामवासियातून केल्या जात आहे. जिल्हाभरातील ग्रामसभा, मासिक सभा प्रभावितग्रामसेवकांचे आंदोलन सुरू असल्याने जिल्हाभरातील ग्रामसभा, मासिक सभा प्रभावित झाल्या आहेत. कारंजा तालुक्याप्रमाणेच वाशिम, रिसोड, मानोरा, मंगरूळपीर व मालेगाव तालुक्यातील ग्रामसभा, मासिक सभा होत नसल्याने गाव विकासात खोळंबा निर्माण झाला.
ग्रामसेवकांचे आंदोलन : आॅगस्ट महिन्यात एकही ग्रामसभा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 4:16 PM